Logo
News.Rayat.in
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
📍 श्रीगोंदा • 📅 ४ फेब्रुवारी २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
रांगोळी, भौगोलिक फोटोग्राफी, प्रश्नमंजुषा स्पर्धा; विद्यार्थ्यांनी दाखविला उत्स्फूर्त सहभाग

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिओ फेस्ट या उपक्रमाचे यशस्वी आयोजन

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात भूगोल विभागाच्यावतीने "जिओ फेस्ट" या दोन दिवसीय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे होते.

जिओ फेस्ट उद्घाटनप्रसंगी मान्यवर

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील स.प. महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रो. डॉ. नितीन मुंढे, प्रा. डॉ. गणेश ढवळे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्रा. डॉ. विजय इथापे आणि श्रीगोंदा शहरातील फिजिओथेरपिस्ट डॉ. शुभम दातीर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन स.प. महाविद्यालयातील प्रो. डॉ. नितीन मुंढे आणि प्रा. डॉ. गणेश ढवळे यांनी केले. जिओ फेस्ट कार्यक्रमात भूगोल विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, भौगोलिक फोटोग्राफी स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.

विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थी

रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थीमवर आधारित रांगोली काढून आपली कलात्मकता सिद्ध केली. फोटोग्राफी स्पर्धेमध्ये भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक क्षेत्रातील छायाचित्रण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो काढून हे छायाचित्र प्रदर्शन साकारले.

दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रश्नमंजुषा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. प्रश्नमंजुषेमध्ये विद्यार्थ्यांना भूगोल विषयाशी निगडित प्रश्न विचारून त्यांच्यातील गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आणि प्रश्नमंजुषामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रा. डॉ. विजय इथापे आणि श्रीगोंदा शहरातील फिजिओथेरपिस्ट डॉ. शुभम दातीर उपस्थित होते. डॉ. विजय इथापे, डॉ. शुभम दातीर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, माजी प्राचार्य डॉ. महादेव जरे यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयातील IQAC कोऑर्डिनेटर डॉ. राहुल गायकवाड, हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजाराम कानडे, स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. अनिल ढवळे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हरिभाऊ वाघीरे, प्रा. देवेंद्र बहिरम, प्रा. निलेश सोनवणे, प्रा. राजेंद्र वाघ, प्रा. रायकर, प्रा. सौ. मनीषा रायकर, प्रा. कु. ढोणे भारती, छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथील भूगोल विभागातील प्रो. डॉ. संदीप कदम, प्रा. साठे, प्रा. कु. वैष्णवी साबळे, कु. प्रा. कल्याणी खेतमाळीस उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये भूगोल विभागाचे सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जिओ फेस्टच्या यशस्वी आयोजनाबद्दल भूगोल विभागाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.