Logo
News.Rayat.in
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
📍 श्रीगोंदा • 📅 २६ एप्रिल २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, बाबासाहेब भोस यांची उपस्थिती; प्रा. भुजबळ व कुटुंबीयांचा सत्कार

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ संपन्न

श्रीगोंदा ( प्रतिनिधी) महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील ज्युनिअर विभागाचे इतिहास विषयाचे प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. या समारंभाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य बाबासाहेब भोस होते. ते म्हणाले की, प्रा.रमेश भुजबळ यांनी उत्तम सेवा केली आहे. रयत शिक्षण संस्थेची बांधिलकी जोपासणारे ते शिक्षक आहेत, असे ते म्हणाले. या समारंभासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, प्रा. रमेश भुजबळ हे उत्तम शिक्षक आहेत. त्यांनी समर्पित भावनेने सेवा केली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी प्रास्ताविक, स्वागत केले, व शुभेच्छा दिल्या.

प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती समारंभ - प्रमुख मान्यवर

रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, माजी सहसचिव प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, माजी सहसचिव उत्तमराव आवारी, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, मिलिंद दरेकर, प्रा.विनोद सासवडकर, अजिंक्य भुजबळ इत्यादींनी मनोगते व्यक्त केली. व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा.रमेश भुजबळ व सौ. सीमा भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती प्रा.रमेश भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून आपली जडणघडण सांगितली. या समारंभासाठी महावीर पटवा, प्राचार्य शहाजी मखरे, प्राचार्य राजपुरे सर, नगरसेवक राजेंद्र खेडकर, प्राचार्य दिलीप भुजबळ, रवीशेठ दंडनाईक, संतोष दरेकर, अंबादास दरेकर, सुनील अनभुले, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव भोसले, प्रा. विजयकुमार नन्नवरे, प्रा. शिवाजी सोनावळे, सलीम सय्यद, अशोक गोंधळी,डॉ.नितीन थोरात, डॉ. सुदाम भुजबळ इत्यादी या समारंभासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांनी मानले.

प्रा. रमेश भुजबळ व कुटुंबीयांचा सत्कार